Mission Rajyaseva 2025 -
Ethics, Integrity and Aptitude Syllabus/ (नीतिशास्त्र सचोटी आणि अभियोग्यता )
महाराष्ट्र लोकसेवा आयोगा नुसार राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 पासून एकूण २०२५ गुणांची असेल. त्यात खालील घटक असतात-
1. लेखी परीक्षा – गुण- 1750 (एकूण 9 पेपर)
2. मुलाखत व व्यक्तिमत्व तपासणी - गुण- 275.
एकूण गुण - 2025.
लेखी परीक्षेतील ९ पेपर चे स्वरूप खालीलप्रमाणे असेल.
1. पेपर 1 - मराठी - गुण 250
2. पेपर 2 - इंग्लिश - गुण 250
- महत्वाचे- पेपर १ आणि पेपर २ ह्यांचे गुण अंतिम निवडीसाठी ग्राह्य धरले जाणार नाहीत (Qualifying Nature)
3. पेपर 3- निबंध - गुण 250
4. पेपर 4 - सामान्य अध्ययन 1 [GS 1] - गुण 250
5. पेपर 5 - सामान्य अध्ययन 2 [GS 2] - गुण 250
6. पेपर 6 - सामान्य अध्ययन 3 [GS 3] - गुण 250
7. पेपर 7 - सामान्य अध्ययन 4 [GS 4] - गुण 250
8. पेपर 8 - वैकल्पिक विषय पेपर 1 - गुण 250
9. पेपर 9 वैकल्पिक विषय पेपर 2 - गुण 250
- महत्वाचे- पेपर 3 – 9 ह्यांचे गुण अंतिम निवडीसाठी (merit) ग्राह्य धरले जाणार.
GS Paper IV- नीतिशास्त्र सचोटी आणि अभियोग्यता /Ethics, Integrity and Aptitude
आयोगा नुसार, या पेपरमध्ये उमेदवारांची सचोटी (integrity), सार्वजनिक जीवनातील समंजसपणा (Probity in Life) आणि समाजाशी व्यवहार करताना त्याला सामोरे जाव्या लागणाऱ्या विविध समस्या आणि संघर्षाबाबतच्या समस्या सोडविण्याच्या दृष्टिकोनाशी (s problem-solving approach and decision making )संबंधित समस्यांबाबत उमेदवारांची वृत्ती आणि दृष्टिकोन (attitude and approach) तपासण्यासाठीच्या प्रश्नांचा समावेश असेल. यावरील प्रश्नांमध्ये पैलू निश्चित करण्यासाठी घटना अभ्यास (Case Study) याचा वापर केला जाईल.
Syllabus-
- नीतिशास्त्र आणि मानवी परस्पराभिमुखताः मानवतेच्या नीतिमत्तेचे सार, निर्धारक आणि परिणाम, नैतिकतेचे परिमाण, नीतिशास्त्र - खाजगी आणि सार्वजनिक संबंधांमधील, मानवी मूल्ये, महान नेते, सुधारक व प्रशासक यांचे जीवन आणि शिकवण यांपासून धडे, मूल्ये रुजविण्यासाठी कुटुंब, समाज व शैक्षणिक संस्था यांच्या भूमिका.
[Ethics and Human Interface: Essence, determinants and consequences of Ethics in human actions; dimensions of ethics; ethics- in private and public relationships. Human Values – lessons from the lives and teachings of great leaders, reformers and administrators; role of family, society and educational institutions in inculcating values.]
- अभिवृत्तीः घटक, संरचना, कार्य; त्याचा प्रभाव आणि विचार व वर्तन यांच्याशी संबंध. नैतिक आणि राजकीय अभिवृत्ती, सामाजिक परिणाम व पाठपुरावा.
[Attitude: content, structure, function; its influence and relation with thought and behaviour; moral and political attitudes; social influence and persuasion.]
- नागरी सेवेसाठी अभियोग्यता आणि मूलभूत मूल्ये, सचोटी, निःपक्षपातीपणा आणि पक्षीय निरपेक्षता, वस्तुनिष्ठता, सार्वजनिक सेवेसाठी समर्पण, सहानुभूती, सहिष्णुता आणि दुर्बल घटकांप्रती सहानुभूती.
[Aptitude and foundational values for Civil Service, integrity, impartiality and non-partisanship, objectivity, dedication to public service, empathy, tolerance and compassion towards the weaker sections.]
- भावनिक बुध्दांक - संकल्पना आणि त्याची उपयोगीता, प्रशासन आणि कारभारामध्ये त्यांची उपयुक्तता आणि उपयोजन. भारत आणि जगातील नैतिक विचारवंतांचे आणि तत्वज्ञांचे योगदान.
[Emotional intelligence-concepts, and their utilities and application in administration and governance. Contributions of moral thinkers and philosophers from India and the world.]
- लोक प्रशासनातील सार्वजनिक / नागरी सेवा मूल्ये आणि नैतिकताः स्थिती व समस्या, सरकारी व खाजगी संस्थांमधील नैतिक चिंता आणि कोंडी; नैतिक मार्गदर्शनाचे स्त्रोत म्हणून कायदे नियम, विनियम व सदसद विवेकबुद्धी, उत्तरदायित्व आणि नैतिक शासन; शासनामध्ये नैतिकता आणि नैतिक मूल्यांचे बळकटीकरण; आंतरराष्ट्रीय संबंध आणि निधीकरणामधील नैतिक समस्या, निगम प्रशासन.
[Public/Civil service values and Ethics in Public administration: Status and problems; ethical concerns and dilemmas in government and private institutions; laws, rules, regulations & conscience as sources of ethical guidance; accountability and ethical governance; strengthening
of ethical and moral values in governance; ethical issues in international relations and funding; corporate governance.]
- प्रशासनातील सभ्यताः लोकसेवेची संकल्पना; प्रशासन व सभ्यता यांचा तत्वज्ञानात्मक आधार, माहितीची देवाण-घेवाण आणि सरकारमधील पारदर्शकता, माहितीचा अधिकार, नीतिसंहिता, आचारसंहिता, नागरिकांची सनद, कार्यसंस्कृती, सेवाप्रदानाचा दर्जा, सार्वजनिक निधीचा विनियोग, भ्रष्टाचाराची आव्हाने.
[Probity in Governance: Concept of public service; Philosophical basis of governance and probity; Information sharing and transparency in government, Right to Information, Codes of Ethics, Codes of Conduct, Citizen’s Charters, Work culture, Quality of service delivery, Utilization of public funds, challenges of corruption.]
- वरील समस्यांवरील घटना अभ्यास. [Case Studies on the above issues.]
0 Comments:
Post a Comment